II रंग पंचमी II
कविता क्रमांक-4
-----------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज दिनांक-१८.०३.२०२२, शुक्रवार, रंगपंचमीचा रंगीत दिवस आहे. "फाल्गुन वद्य पंचमीला प्रामुख्याने महाराष्ट्रात साजरा केला जाणारा हिंदूंचा एक उत्सव. होळी मागोमाग येणारा आणि सर्वांना हवा हवासा वाटणारा दुसरा सण म्हणजे 'रंगपंचमी'. 'रंगपंचमी' हा सण येतो फाल्गुन कृष्णपंचमीला, ह्या दिवशी सर्व लोक रंग खेळतात. एकमेकांच्या अंगावर रंग टाकतात." मराठी कवितेच्या माझ्या सर्व भाऊ-बहिणी, कवी-कवयित्रींनI रंगपंचमीच्या हार्दिक रंगीत शुभेच्छा. चला, तर वाचूया, या रंग-सणाच्या काही कविता--
आनंदाची उधळण
-----------------
आला आला गं सयांनो
रंगपंचमीचा सण
खेळू उडवू या रंग
आनंदाची उधळण
जमू सारे एकजुटी
उधळण्या सप्तरंग
नामा शिवा ताना बाजी
वाटू खुशीचे तरंग
दिस आलेत सुखाचे
जपू हृदयात क्षण
नको मनावर ओझे
मणभर असे घण
मुक्ती तणावातुनही
वागू स्वच्छंदी निर्भय
घोट सुखाचा पिऊनी
जगू मस्त सहृदय
दिनरात राबताना
घेऊ मुखे हरिनाम
स्मित फुलता वदनी
मिळे संचिताचा दाम
--भारती सावंत
--------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-18.03.2022-शुक्रवार.