Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: Atul Kaviraje on March 20, 2022, 06:05:21 PM

Title: II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II-पोवाडा
Post by: Atul Kaviraje on March 20, 2022, 06:05:21 PM
                              II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
                                             पोवाडा
                            -----------------------------------

मित्र/मैत्रिणींनो,

      उद्या दिनांक-२१.०३.२०२२-सोमवार, छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती आहे. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करणार आहेत. महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवयित्रींनी शिव-जयंतीच्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया या सुमुहूर्तावर लेख,भाषण,निबंध,शुभेच्छा,कोट्स,स्टेटस,सुविचार,शायरी,पोवाडे आणि बरंच काही.

       शिवजयंती पोवाडा मराठी / Shiv jayanti powada in marathi---

माझ्याही शिवबांच एक राज्य होत,
जगाहून सुंदर अस ते स्वराज्य होत ll
सुख शांती समाधान नांदत जिथे,
अस ते एक बहूजन स्वराज्य होत ll
जाती धर्म पंथाचा भेदभाव नव्हता,
न्याय हा सर्वांसाठी एक समान होता ll
न्यायासाठी प्राण गेला तरी चालेल,
पण अन्याय कुणावर झाला नव्हता ll
राज्यांचा राज्य कारभार असा होता,
गवताची कडी सुद्धा गहाण नव्हती ll
स्वतःसाठी सारेच जगतात या जगी,
रयतेसाठी जगणारे शिवराय होते ll
स्वराज्यासाठी अर्पीले प्राण ज्यांनी,
अवघा महाराष्ट्र घडविला हो त्यांनी ll
कितीही गुणगान केले तरी कमीच,
असे अमुचे छत्रपती शिवराय होते ll⛳
=========================

अनेक झाले पुढेही होतील
अगणित ह्या भुमीवरती
जाणता राजा एकची झाला
तो फक्त "राजा शिवछत्रपती"।। १ ।।
धर्म मराठा अभय मिळाले
सर्व समानभान नित्य आचरले
भगवा झेंडा घेऊन हाती
केली चहूकडे जनजागृती
तो फक्त "राजा शिवछत्रपती"।। २ ।।
जिजाऊ माऊली दिव्य प्रेरणा
गुरू तुकाराम देऊ ज्ञाना
धाडसी मावळे भवानी सोबती
म्हणे हरहर महादेव गर्जती
तो फक्त "राजा शिवछत्रपती"।। ३ ।।
स्वारी केली किल्ले घेऊनी
काही जिंकुन काही बाधून
मोगल नमले शिकस्त संपली
भल्याभल्यांची झोप उडवीली
तो फक्त "राजा शिवछत्रपती"।। ४ ।।
रयतेचं राज्य स्थापनेसाठी
मावळे जमले विजयासाठी
ऐक्यासाठी दिली आहुती
मिळाली ज्यांना विरगती
तो फक्त "राजा शिवछत्रपती"।। ५ ।।
मराठा राजा महाराष्ट्राचा
म्हणती सारे माझा – माझा
आजही गौरव गिते गाती
ओवाळूनी पंचारती
तो फक्त "राजा शिवछत्रपती"।। ६ ।।
⛳|| जय जिजाऊ ||...
|| जय शिवराय ||....
|| जय शंभुराजे|⛳
==========================

आस्ते कदम ! आस्ते कदम !! आस्ते कदम !!!
महारा...ज
गणपती,
भूपती ,
प्रजापती,
गज..पती,
आश्वपती ,
जयपती,
सुवर्ण रत्न श्रीपती ,
न्यायालंकार मंडित,
शास्त्रातशस्त्रपारंगत ,
राजनीती धुरंधर,
गौब्राम्हण प्रतिपालक ,
प्रौढ प्रताप पुरंदर ,
क्षत्रिय कुलावतंस ,
सिंहासनाधिश्वर,
राजाधिराज,
योगीराज
श्रीमंत ,
⛳श्री ! श्री !! श्री !!!
छत्रपती शिवाजी महाराज की जय!!!!!!!⛳
==========================


by योरसेल्फ स्टेटस
------------------

                  (साभार आणि सौजन्य-संदर्भ-योरसेल्फ स्टेटस.कॉम)
                 ----------------------------------------------


-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-20.03.2022-रविवार.