विषय: इथेनॉल आणि मिथेनॉल पेट्रोल -डिझेल यांचे भविष्यातील बायो-फ्लेक्स पर्याय .
भविष्यातील इंधन-बचत-चारोळ्या
"इथेनॉल मिथेनॉल बहीण भाऊ,पेट्रोल डिझेलच्या नणंद जाऊ"
(भाग-2)
--------------------------------------------------------------------------
(6)
वाहन आता चांगलंच मायलेज देऊ लागलंय
खिशालाही वाहन -चालकांच्या दर परवडू लागलाय
वाहनाने खुशीतच आपला एक्सेलरेटर दाबून ,
महा -मार्गावर मनसोक्त भन्नाट वेग घेतलाय .
(7)
"पेट्रोल डिझेलनी" या फॅमिली मेम्बरांचे जंगी स्वागत केलाय
यांच्या मरणासन्न अवस्थेत त्यांनीच तर तारलंय
गुण्या -गोविंदाने एकत्र राहून चौघांनी साऱ्या जणांना ,
एकतेचा , समतेचा उत्तम आदर्श धडा शिकवलाय .
(8)
सामान्य माणूस आज भलताच खुश आहे
पेट्रोल -पंप कर्मचाऱ्यांना बोनस वाटण्यात आलाय
पेट्रोल -पंपावर दिवाळी साजरी केली जातेय ,
हे सर्व "इथेनॉल , मिथेनॉलमुळेच" शक्य झालेय .
(9)
मका , ऊस , तांदुळाची मागणी वाढतेय
"इथेनॉल , मिथेनॉलचे" तेच तर शेती -जनक आहेत
बारमाही पिके भरमसाट घेऊन , शेतकरी ,
महागड्या गाड्यांचा मालकही बनला आहे .
(10)
सलाम तुला , आधुनिक तंत्रज्ञाना
अन शोध लावणाऱ्या त्या शास्त्रज्ञांना
"इथेनॉल , मिथेनॉलचे" दान घालून पदरात ,
चांगले दिवस आलेत आज , वाहनांना अन वाहन -चालकांना !
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.04.2022-बुधवार.