विषय :शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज -प्रकरणी अटक
वास्तव ड्रग्ज -विरोधी चारोळ्या
"गळाला लागताहेत छोटे मासे ,ड्रग्ज सेवन करताहेत मोठे ससे"
(भाग-2)
----------------------------------------------------------------
(6)
जगभर पसरलंय "ड्रग्जचे" माफिया जाळे
इंटरनेटपेक्षाही याचे महाजाल आहे अति -भव्य
आजच्या पिढीला बिघडवून ,करून आयुष्याचे मातेरे ,
करताहेत कार्य अति -दिव्य ,कमावताहेत भरमसाट द्रव्य ?
(7)
अरे "आर्यन" , सोड संगत या विषाची
अजुनी तुझे दुधाचे दातही नाही आलेत !
यापुढे फुंकून पी तू आयुष्याचे ताकही ,
मग म्हणू नकोस गरम दुधाने माझे ओठ पोळलेत !
(8)
या आई -वडिलांचे लक्ष्य नाहीय अपत्यांवरी
आपल्याच विश्वात , कार्यात असतात ते मग्न
पराक्रम समजताच सुपूतांचे , जेव्हा येतात चव्हाट्यावर ,
म्हणती , आयुष्य केलयं आमचे या दिवट्याने भग्न .
(9)
याची पाळे -मुळे अति रुजलीत खोलवर
थांग नाही , पत्ता नाही , खबर नाही
पोखरतंय "ड्रग्ज" घेणाऱ्यांचे शरीर आतून -बाहेरून
(SLOW-POISON) मंद विषबाधा होऊन मरणच त्यांचा घास घेई .
(10)
व्हावे (COUNSELLING) समुपदेशन या पौगंड-युवांचे सर्वतोपरी
सुमार्गावर आणावे तयाना , या विनाश -वाटेवरुनी ,
हाच एक आहे सुपंथ ,आणावे तरुणाईस परत फिरुनी ,
रस्त्यात जागोजागी पेरलेल्या या "ड्रग्जरूपी" काट्यांवरूनी .
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.05.2022-सोमवार.