मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-6
-------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--ही चारोळी लिहिणाऱ्या चारोळीकाराने जीवनाच्या न संपणाऱ्या प्रवासाचा बरा -वाईट अनुभव घेतलेला दिसतोय . तो म्हणतोय , अपेक्षित , हवहवंस वाटणार सारंच काही तुमच्या मनासारखं होत नसत . तुम्ही ज्याची आस करता , जी स्वप्ने तुम्ही पाहता , ती सारीच काही पूर्ण होतील असेही नाही , अथवा , ज्याची इच्छा मनी धरता , त्या सर्वांची पूर्तता होईलच असे नाही . जीवनात सगळंच मिळतं नसतं . काही निसटूनही जात असतं . अगदी घट्ट मुठीतल्या वाळूसारखं . परंतु इच्छित गोष्ट किंवा वस्तू न मिळाल्यामुळे अगदीच काही हात पाय गाळून बसायचं नसतं . प्रयत्न हा शेवटपर्यंत करायचाच असतो . तो अर्धवट सोडायचा नसतो .
आणि पुढे जाऊन हा नवं -चारोळीकार असंही म्हणतो , हे सारं काही तुम्हाला एकट्यालाच जमण्यासारखं नाही आहे , हा प्रवास अथांग ,लांबचा आहे . तुम्हाला एका साथीदाराची नेहमीच गरज भासत राहणार . नव्हे त्याच्या आधारानेच तर तुम्ही जीवनरूपी भवसागर अगदी सहज पार करू शकाल .तेव्हा हरायचे नाही , हातचे निसटून गेले , म्हणून दुःखही करायचे नाही . तो तुमचा साथीदार , तुमचा जीवनभर तुम्हाला साथ देणारा कुणी एक , आयुष्याच्या पुढील टप्प्यावर तुमची वाट पहात आहे . पुढील वळणावर तो तुमच्यासाठी थांबून राहिला आहे . फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच तो तिथे आहे . त्याला तुमची जाणीव आहे . आणि मला खात्री आहे की तुम्ही त्याच्या मदतीने तुम्हाला हवे ते पुन्हा प्राप्त करू शकाल , मिळवू शकाल .
=================
जीवनात सगळंच मिळत नाही
म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो
कुठल्यातरी वळणावर ,
आपली वाट पहाणाराही असतो .
=================
--नव-चारोळीकार
----------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी जर्नल.इन)
------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-21.05.2022-शनिवार.