चारोळी पावसाची
क्रमांक-15
------------------
मित्र/मैत्रिणींनो,
ती वाट म्हणतेय, आम्ही त्याची वाट पहातोय, त्या पावसाची वाट पहातोय, कि तो आता येईल त्याचा ऋतू सुरु झालाय, तो येईल आम्हा भिजवेल, आम्हा साफ करील, आपल्या अमृत-थेंबाचे आमच्यावर सिंचन करील, आम्हाला या धुळीच्या गर्तेतून सोडवील, स्वच्छ करील, आम्हाला या पातकातून मुक्त करील, पावन करील, आम्ही डोळे लावून अगदी आतुरतेने त्याला पाहण्यास उत्सुक आहोत. तो येईल पडेल, अगदी मनापासून त्याला आमच्यावर कोसळू दे, हे सर्व अमंगल निघून जाऊन आम्हाला तो मंगल करू दे, पुन्हा एकदा आम्हा पवित्र होऊ दे, आम्ही त्याचे जन्मभर ऋणी राहू, कारण तो असा एकच आमचा जीवन दाता आहे कि फक्त तोच आणी तोच पुनरुज्जीवन देऊ शकतो, आणी या वाटेच्या प्रार्थनेला मान देऊन तो अति-प्रामाणिक पाउस आला आणि त्या रस्त्याला भिजवून गेला, त्याला साफ करून गेला, त्याला मंगल करून गेला, त्याला पवित्र करून गेला, हे काही सांगायला नकोच. असो, तर हा रस्ता, हि वाट त्याचे हे अमृत-जल अंगावर घेऊन पावन झाली आहे, तृप्त झाली आहे, मंगल झाली आहे.
उद्धारक पाऊस
---------------
आस कुणाचीतरी आहे आज
कुणीतरी उद्धारा येईल आज
पतित पावन बनून कुणीतरी
आम्हा पावन करील आज
आमचे पातक पोटी घेऊन
आमचे मलीन अंग पुसून
केलेस आमच्यावर अति-उपकार
अन केलास अमुचा उद्धार
================
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.07.2022-शनिवार.