चारोळी पावसाची
क्रमांक-18
------------------
मित्र/मैत्रिणींनो,
एवढेच करून तो खोडकर , व्रात्य, स्वैर पवन इथेच थांबला नाही, तर चक्क तो पहाता पाहता समोरील वनात, रानात प्रवेश करता झाला, सर्व पर्ण - राई त्याने आपल्या सहस्त्र बाहुनी कवेत घेऊन , सर्व झाडांना, पानांना, फुलाना गोंजारीत तो सगळीकडे कसा मोदीत होऊन फिरत, विचरत राहिला. त्याना तो वदू लागला कि, हे राना, हे वना तुम्हीही साऱ्यांनी आता एक अनुभव घेण्यास तयार रहा, कारण तुमचा जीवन-दाता जलाच्या रूपाने थोड्याच वेळात तुम्हाला भेटण्यास येत आहे, त्याच्या स्वागता तयार रहा . असे म्हणून त्याने त्याची ती ओळखीची शीळ पर्ण राई तून घुमवण्यास सुरुवात केली . तो खुश असला कि नेहमीच त्याची हि शीळ तयारच असतो, त्याच्या या निरोपाने हे रान, वन, हि पर्ण - राई हि आनंदी झाली, व हर्षे डोलू लागली, त्यांना अधिकच डोलवित, झुलवीत मग हा खोडकर पवन त्या पर्ण राईतून आपली मधुर शीळ घुमवीत इतरे जनाना या पावसाचा निरोप देण्यास बाहेर पडला.
प्रामाणिक पाऊस
----------------
पाउस माझा असाच आहे
त्याचे पडणे अचानक आहे
मनस्वी जरी असला तो
तरी पाडण्यात तो नेक आहे.
==============
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-15.07.2022-शुक्रवार.