चारोळी पावसाची
क्रमांक-27
----------------
मित्र/मैत्रिणींनो,
--प्रस्तुत चारोळीतून , चारोळीकारास नेहमीच एक प्रश्न , आणि त्या प्रश्नाचे न उकललेले उत्तर , त्याला नेहमीच सतावत राहते , असे दर्शविण्यात आले आहे . हे न सुटलेले कोडे आजवरही तसेच आहे . या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा तो दर -वर्षी प्रयत्न करतो , पण त्याला त्यात काही यश येत नाही . पावसाची सुरुवात झाल्यावर तो पडणे , थांबून पडणे इथवर तर ठीक आहे . ते तर नैसर्गिक झाले . पडणे हा त्याचा निसर्ग -नियमाचा एक भाग बनून राहिला आहे. आणि तो त्याप्रमाणे दरवर्षी , दरसाली येऊन पडणारच .
या चारोळीकारास न सुटलेले कोडे , असे की जेव्हा पाऊस निसर्ग -नियमांच्या विरुद्ध जाऊन पडतो , ढग -फुटीने बरसतो , धो धो कोसळतो , सर्व सर्व काही वाहून नेतो , अक्षरशः जग -बुडी आणतो , तेव्हा त्याला वारंवार असं वाटत की , या पावसाचे काही बिनसले आहे . तो नेहमीप्रमाणे पडत नाहीय , त्याचे काही तरी हरवले आहे , त्याचे कुणी काही हिरावून नेले आहे , तो क्रुद्ध होऊन बरसतोय , तो रुद्र होतोय , तो तांडव करतोय . तो इतका तीव्रतेने कोसळतोय , की जणू कोणासाठी तरी तो रडतोय , कोणाच्यातरी आठवणीने रडतोय , त्याचा कंठ दाटून येतोय , आणि तो सतत कोसळतोय .
हा नवं -चारोळीकार पुढे मिश्किलीने म्हणतो , की हा पाऊस तर देव आहे , आणि आम्ही मर्त्य -मानव . आम्हाला सर्व भाव -भावना , जाणीवा आहेत . कुणी हरवले , कुणी सोडून गेले , मना -विरुद्ध झाले आणि इतर बऱ्याच विपरीत घटना घडल्या की आम्हा मानवांना रडू कोसळते . आमच्या हातात तेव्हा रडण्याशिवाय दुजा कोणताही मार्ग नसतो . कारण आम्ही एक सामान्य माणूस आहोत , मानव आहोत . पण हा सर्व -शक्तिमान पाऊस तर बलाढ्य असूनही इतका हतबल का होतोय बरे ? तो आपल्या संतत -धारेतून कुणासाठी गळा काढीत आहे ? काय याचे कारण की तो आपले रडू थांबवित नाहीय ? म्हणून हे पावसा , आम्हा मानवाचे तुजपाशी एकचं मागणे आहे , की हे कोसळणे , कोसळताना रडणे तुला शोभा देत नाही , तू महाशक्तिमान , बलाढ्य आहेस , तू तसाच राहा , तू फक्त पड आणि आम्हा जल -संजीवनी दे .
रडणारा पाऊस ?
----------------
कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो......
===============
--नव-चारोळीकार
----------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-मन माझे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
-------------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.08.2022-सोमवार.