तनात मनात श्वासात ध्यासात
स्वप्नात मन का हे फुलले
धुंदी हि डोळ्यात प्रीतीही मनात
तुझे नि माझे सूर जुळले ...
भाव कसा मग डोळ्यांमधुनी
गुज मनीचे सांगितले
दवबिंदू हे पानांवरती
बघता मन हे बावरले
क्षणात मनात श्वास हे श्वासात
फुलून मन हे मोहरले
लहर स्पर्शात बेधुंद अंगात
लाजून हसून थरथरले
दो नयनांची कमले फुलली
तुजला हे मी सांगू कसे
फुलातला हा गंध पसरला
तुझी नि माझी प्रीत जुळे
हळूच येवून कवेत घेवून
तिमिराचे क्षण दरवळले
आतुर होऊन अधीर नयन
सांगू कसे हे मन भरले
कविता बोडस
sundar!!!
nice one.....
khup khup chan.
Khupach sunder !!!! I really enjoyed it
too good dear ............. mala khup khup khup avadali hi kavita .......... keep writing and keep posting :)