मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-50
-------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--लोकांवर किती विश्वास ठेवायचा आणि नाही ठेवायचा , आणि ठेवला तर त्याची फल -प्राप्ती काय , याची बखुबी , अगदी उत्तम जाण असलेली ही चारोळी , या नवं -चारोळीकाराच्या लेखणीतून प्रसवली आहे . याबद्दल या चारोळीकारIचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत . जीवन कसं जगायचं , हे त्याला आस -पासच्या लोकांनी दाखवून दिल्याचे बहुधा दिसतंय . तर अश्या या चारोळीकारास आपल्या जीवन -भरात अनेक विक्षिप्त माणसे , अनेक व्यक्ती आणि अनेक वल्ली भेटल्याचे या चारोळीतून समजून येते .
पुढे तो असं म्हणतोय , कुणा -कुणावर मी विश्वास ठेवायचा , भरोसा ठेवायचा ? या लोकांना मी नीट ओळखू शकलो नाही . काम अडले म्हणून , मदतीची अपेक्षा , याचना करीत मी अनेक ओळखीच्या आणि अनोळखी लोकांवर विसंबून राहिलो . पण हे करण्यातच माझी मोठी चूक झाली हे मी कबूल करतो , मान्य करतो . हा मी इतरांवर ठेवलेला भरोसा , प्रत्यक्षात विश्वासघातच होता , हे मी अनुभवाने येथे सांगतोय . ज्यांच्यावर मी अति -विश्वास ठेवला , त्यांनीच मला धोका दिला . शेवटपर्यंत माझे काम तर नाहीच झाले , उलट -पक्षी , त्यांनी मला असा विपरीत धडा शिकवला , की मी जन्मभर , आजवर हे भोगतोय , आणि त्याचे प्रायश्चित्तही करतोय .
आणि अजून एक सांगायचं बाकी राहिलं , असं हा चारोळीकार आवर्जून सांगतो . तो म्हणतो , की हे झालं दुसऱ्यांवर अति विसंबून राहिल्याचा परिणाम म्हणा , किंवा दुष्परिणाम . पण आता असंही घडतंय , की मी इतका प्रामाणिक , अंतर्मनातून साफ , स्वच्छ ,मोकळा , शुद्ध चारित्र्याचा , पावन विचारांचा असा . पण या लोकांचा माझ्यावरही विश्वास नाही , हे तर जरा अति होतंय . आता असं वाटू लागलाय की हा जो विश्वास आहे , तो जणू त्या पानिपतात धारातीर्थी पडलाय बहुधा . आता तो परतून येणे शक्य नाही , कदापिही नाही . आता या विश्वासाची फक्त वाट पहात राहावी . हे जगच असं झालंय की कुणाचाही कुणावर विश्वास , भरोसा राहिला नाही . सद्य परिस्थितीच याला कारणीभूत असावी . असो , आता मी माझ्या शब्द -कोषातून विश्वास , भरवसा , भरोसा हा शब्द कायमचाच वगळला आहे , काढून टाकला आहे , बाद केला आहे .
==============
कुणी, आपल्यावर कोणाचा
भरवसा नाही म्हणून रडतो
तर कुणी, आपण इतरांवर
भरवसा ठेवला म्हणून रडतो.
==============
--नवं-चारोळीकार
----------------
(साभार आणि सौजन्य-मराठी विचार.कॉम)
--------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.08.2022-शुक्रवार.