रत्नांच्या जाहल्या खापरखुंटी
विडंबन कविता संग्रह
------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज ऐकुया आजच्या पिढीची एक नवोदित कवयित्री "निकिता राजेश पाटील" यांच्या, "रत्नांच्या जाहल्या खापरखुंटी" या विडंबन कविता संग्रहातील एक विडंबन कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "रत्नांच्या जाहल्या खापरखुंटी"
कविता क्रमांक-१
"रत्नांच्या जाहल्या खापरखुंटी"
----------------------------
ऐकI हो ऐकI , वेगळ्या आगळ्या गोष्टी
तुटली कशी उडणाऱ्या म्हातारीची झाडू यांची करूया खरीखोटी
"अकडम डमडम" करत फिरणारी गायब कशी झाली जादुई काठी ,
सूत तुटले जिचे अशी कशी वस्त्रे विणणारी यक्षांची ती धोती ?
दगडे देते आता, पूर्वी सोन्याची नाणी देणारी अशी कशी ती पेटी ?
निरनिराळ्या अद्भुत गोष्टींची जाहली मनी दाटीवाटी ,
ऐकली का कधी गोष्ट ही
"रत्नांच्या जाहल्या खापरखुंटी "
"परिसIने केले लोखंडाचे सोने "
हे ऐकलेच असेल ,मात्र रत्नांच्या जाहल्या कैशा खापरखुंटी हे कोण जाणे !
डोळे झाकूनीही सापडते समुद्राच्या लाटांत सागरगोटी ,
सांगेल का कुणी मज , रत्नांच्या जाहल्या कैशा खापरखुंटी ?
हाकरिता पवनही घाले मिठी , सांगेल का कुणी मज
रत्नांच्या जाहल्या कैशा खापरखुंटी ?
कोडी सोडविता सोडविता मती होईल कुंठित , वेळ वाटेल छोटी ,
सांगेल का कुणी मज , रत्नांच्या जाहल्या कैशा खापरखुंटी ?
उत्तर -स्पष्टीकरण कुणीतरी द्यावे , या समस्यापूर्तीसाठी ,
सांगेल का मज , रत्नांच्या जाहल्या कैशा खापरखुंटी ?
--कवयित्री "निकिता राजेश पाटील"
-------------------------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-इ साहित्य.कॉम)
----------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.08.2022-बुधवार.