"कविता पावसाच्या"
कविता-छत्तिसावी
-----------------
मित्र/मैत्रिणींनो,
पावसावरच्या सुंदर कविता-paus kavita in marathi वाचायच्या असतील तर तुम्ही योग्य जागी आला आहात. इथे तुम्हाला नवीन सुंदर पाऊस कविता वाचायला मिळतील. ह्या लेखाद्वारे सुंदर rain poem in marathi म्हणजे पावसावरील कवितांचा संग्रह उपलब्ध करून दिला आहे. मला आशा आहे तुम्हाला ह्या पाऊस मराठी कविता paus marathi kavita नक्की आवडतील
"पाऊस आला"
--------------
अवखळ रिमझिम
पाऊस आला
चराचराला
भिजवीत सुटला
चिंबचिंब
सृष्टी भिजली
हरिततृणांची
झालर रूजली
डोंगरदऱ्यांतही
झरे प्रसवले
भरभरून पाणी
वाहू लागले
हिरव्या हिरव्या
गर्द शिवारी
नाले ओथंबले
लाल सोनेरी
थेंवाथेबांची
किमया मोठी
पानापानांवर
झळाळले मोती
ईंद्रधनुचे
रंग ऊधळले
नभोमंडपी
तोरण सजले
वीजा वाऱ्यासवे
कडाडल्या
उन पावसाच्या
खेळात रंगल्या
आला रे आला
पाऊस आला
सर्वत्र आनंद
घेऊन आला !!
--AUTHOR UNKNOWN
-------------------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-हिंदी माहिती.कॉम)
-------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.08.2022-शुक्रवार.