चारोळी पावसाची
क्रमांक-40
----------------
मित्र/मैत्रिणींनो,
--नवं-चारोळीकार या चारोळीच्या माध्यमातून पावसाचे महत्त्व , इतर-जणांना न जाणवलेले, न कळलेले अनाकलनीय असे एक रहस्य सांगून जातोय , एका गूढ रहस्याची उकल तो आज करीत आहे . हा पाऊस तर दरवर्षी येतो , आम्हाला ओले चिंब करतो त्यात काय मोठंसं ? तो तर नेहमीच न चुकता पडतो, सार्यांना भिजवतो . त्यात काय मोठंसं ? असे अनेक प्रश्न मूढ-जनांकडून नेहमीच विचारले जातात . प्रत्यक्ष पावसाचे काय महत्त्व आहे , आणि ते फक्त जल-प्राशन किंवा पाण्याचे तलाव भरण्याइतकेच आहे , एवढेच हे मूर्ख-लोक सांगू शकतात . त्यांचे तोकडे ज्ञान, त्यांची थिटी माहिती ही फक्त इतकीच . बाकी सगळी बोंब .
पण आज या नवं-चारोळीकाराने , या चारोळीतून त्यांचे पावसाबद्दलचे तोकडे ज्ञान, माहिती दाखवून दिली आहे . तो म्हणतोय , हे मित्रांनो, पावसाचे महत्त्व फक्त एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. तुम्हा सर्वांना न कळलेली एक गोष्ट मी तुम्हाला आज सांगत आहे , ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल . तर हे लोकहो , पहिला पाऊस जेव्हा पडतो , धरित्रीवर येऊन तिची गाठ-भेट घेतो , धरेच्या , जमिनीच्या मृत्तिकेवर येऊन जेव्हा प्रथम स्पर्श करतो , तेव्हाचा मृद-गंध तुम्ही कधी घेतला आहे का ? तुम्ही फक्त इतकेच पाहता , की पाऊस आलाय . पण मूर्खांनो , तुम्हाला हे कधी जाणवले आहे का , की या पावसाच्या पाण्याचा मातीशी झालेला प्रथम स्पर्श , हा केवळ किमयाच घडवून जात नाही , तर तिला तो परीस-स्पर्शही देऊन जातो .
पुढे तो म्हणतोय , की जर तुम्ही बारकाईने पहिले , तर ती हवा , तो वारा आपल्या नासिकेद्वारे छातीत भरून घेतला , की तुम्हाला हे जाणवेल की एक अनोखा न जाणवेलला परिमळ , सुगंध , दैवी सुवास , देव-लोकीचा सुरभ तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जात आहे . मित्रांनो , जगातील कुठल्याही महागडया अत्तराला या अनोख्या , आगळ्या-वेगळ्या सुगंधाची उपमा , सर कधीही येऊ शकणार नाही , इतके श्रेष्ठ याचे वैशिष्ट्य आहे . जगातील सारी भारी अत्तरे , जरी एक केलीत , तरी हा मृत्तिका दरवळ , की ज्याला पाऊस-थेंबाचा परीस-स्पर्श झालाय , हा नेहमीच वरचढ ठरेल . आज मला कधी नव्हे ते जाणवतंय , की ही किमया फक्त हा पाऊसच करू शकतो . आज बातमी ऐकायला मिळतेय , की पहिल्या पावसाने बाजारात बाजी मारून नेली , आणि या मातीच्या सुगंधापुढे साऱ्या अत्तरांचे भाव , दर धडाधड कोसळले . जी जी अत्तरे आजवर फुका मिजास करीत होती , ती एका क्षणांत , या मृत्तिका-गंधाने मातीमोल केली . या अत्तरांचे गर्व-हरण करीत ही माती पावसाच्या प्रथम सरीने , थेंबाने पहा कशी पावन झाली , पुनीत झाली , धन्य झाली .
अत्तरांचे गर्व-हरण
-----------------
"भाव अत्तराचे आज पार कोसळले ...
थेंब 🌧पावसाचे जेव्हा मातीत मिसळले..."
.........☔
मिजास अत्तरांची
क्षणात विरून गेली....
पहिलीच सर जेव्हा,
मातीत जिरून गेली......☂
💦...पहिल्या पावसाच्या शुभेच्छा...💦
===================
--नवं -चारोळीकार
-----------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-मराठी पिक्चर्स.कॉम)
--------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.08.2022-शनिवार.