"मिलिंदछंद"
------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज वाचूया, श्री मिलिंद छत्रे, यांच्या "मिलिंदछंद" या ब्लॉग मधील एक गजल. या गजलचे शीर्षक आहे- "ऋतू येत होते ऋतू जात होते"
मायबोलीवर वैभव जोशी ह्यांनी जी गजल कार्यशाळा आयोजित केली होती त्यात मी लिहिलेली ही गजल..
ऋतू येत होते ऋतू जात होते--
---------------------------
ऋतू येत होते ऋतू जात होते
तरी तेच माधुर्य प्रेमात होते
नजर भिडविता पूर्ण घायाळ झालो
किती लाघवी तीर भात्यात होते
मुकी राहुनी ही किती बोलली ती
उतरले तिच्या भाव डोळ्यात होते
अता सार्थकी लागला जन्म माझा
तिचे मखमली श्वास श्वासात होते
रुढींची वृथा का तमा बाळगू मी?
मला साथ द्याया तिचे हात होते
तिच्या पासुनी वेगळे मज करावे
कुठे एवढे धैर्य काळात होते?
--मिलिंद छत्रे
(Friday, December 21, 2007)
---------------------------------
(साभार आणि सौजन्य-मिलिंद छत्रे ब्लॉगस्पॉट.कॉम)
(संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
---------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-02.09.2022-शुक्रवार.