"सौरभ बोन्गIळे"
----------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज वाचूया, "सौरभ बोन्गIळे" यांच्या ब्लॉग मधील एक कविता. या कवितेचे शीर्षक आहे- "हिशोब... काहीच्या काही..."
हिशोब... काहीच्या काही...--
------------------------
बसलेलो मी एकदा असाच, एका निवांत क्षणी
जमवून आठवणी, मनात काही अन् डोळ्यात काही...
मांडला हिशोब सगळा, जगलेल्या पुर्ण आयुष्याचा
प्रत्येक त्या क्षणाचा, हसलेलो काही अन् रडलेलो काही...
जमाबाकीच्या ताळेबंदात, स्तंभ दोन पडले
क्षण मी विभागले, सुखांचे काही अन् दुःखांचे काही...
झाली गणिते सगळी, मोजणीस ना काही उरले अन्य
शेवटी बाकी शुन्य, ना गमावले काही ना कमावले काही...
--सौरभ
--------
(साभार आणि सौजन्य-सौरभ बोन्गIळे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
(संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
-------------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.09.2022-रविवार.