"ठसा"
-------
मित्र/मैत्रिणींनो,
आज वाचूया, "ठसा" या ब्लॉग मधील एक लेख. या लेखाचे शीर्षक आहे- "ऑस्करची चालुगीरी"
ऑस्करची चालुगीरी--
------------------
मानाचा समजला जाणारा ऑस्कर पुरस्कार सोहळा २७ फेब्रुवारीला आहे. पारदर्शक कारभार असुन सुद्धा काही वाद या पुरस्कार सोहळ्याला चिकटले आहेत. ऑस्करवर असलेले काही गंभीर आरोप:
ऑस्करला निग्रोंचं वावडं--
ऑस्करला आणि एकुणच अमेरिकेला निग्रोंचं वावड आहे. हॅथी मॅक-डेनियल आणि हॅले बेरी असे अपवाद सोडले तर ऑस्कर मधे काळ्यांना स्थान नाहीये.
ऑस्करच्या बेस्ट ऍक्ट्रेसचा डिवोर्स--
१९३६ ते २०१० पर्यंतच्या ७५१ बेस्ट ऍक्ट्रेस नॉमिनी झाल्यात. त्यातल्या बेस्ट ऍक्ट्रेस पुरस्कार मिळालेल्या ६३% ऍक्ट्रेसचा डीवोर्स झालेला आहे. उदा. सॅड्रा बुलक, हिलरी स्वॅंक, केट विन्स्लेट, ज्युलिया रॉबर्ट्स, हॅले बेरी.
ऑस्कर अमेरिका धार्जिणी--
अमेरिका विरोधी असलेला चित्रपट नॉमिनेशन पर्यंत जातो. पण चित्रपटाचं कितीही कौतुक झालेलं असो, बॉक्स-ऑफिस वर पिक्चर हिट असो, जर चित्रपटात अमेरिकेच्या विरोधात काही असेल तर तो ऑस्कर मधुन बाद होतो. उदा. गॅंग्स ऑफ न्युयॉर्क, शिकागो, अवतार.
ऑस्करला लठ्ठ लोकांचं वावडं--
लठ्ठ लोकांना ऑस्कर मिळत नाही, एक मॉनिक्युचा अपवाद सोडला तर.
ऑस्करला कुरुपपणाचं आकर्षण--
नॉन गॅमरस लुक असलेले चित्रपट, गरीबी / दारिद्र दाखवणारे चित्रपट, गलिच्छ वातावरण, भुक आणि असेच विषय असलेले चित्रपट ऑस्कर ज्युरीला आवडतात. उदा. स्लमडॉग मिलेनियम.
--AUTHOR UNKNOWN
-------------------------
(THURSDAY, FEBRUARY 24, 2011)
--------------------------------------
(साभार आणि सौजन्य-ठसा.ब्लॉगस्पॉट.कॉम)
(संदर्भ-मराठी ब्लॉगर्स.नेट)
----------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-09.09.2022-शुक्रवार.