मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-69
------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--नवं-चारोळीकाराचा कविता किंवा चारोळी करण्याचा हा पहिलाच प्रयत्न असावा , असे या चारोळीतून दिसत आहे . तो म्हणतोय , की हा माझा प्रथमच प्रयास आहे , त्यामुळे काही चुकलं , यमक जुळला नाही तर सांभाळून घेणे . आताशी कुठे मी सुरुवात करीत आहे . शब्दाला शब्द , ओळीला ओळ नाही जुळवता आली , तर समजून घ्या . आणि कृपया तुमचा , वाचकहो एक गैरसमज दूर करा . जरी जमत नसलं , तुम्हाला वाटतं असलं की या नवजात चारोळीकारास काहीच येत नाही , त्याच्या ते मनातूनच उमटत नाही , मनातूनच स्फुरत नाही . पण असं जरी तुम्हाला वाटलं , तरी हा माझा छोटासा एक नवा प्रयत्न तुम्ही जाणून घ्या , उमजून घ्या आणि मला यापुढे कविता करण्यास , चारोळी करण्यास प्रेरित करा .
===============
इथं न चालणारं लिखाण
मनातून आलेलं नसतं
असं काहीसं तुम्हाला वाटलं तरी
तो नविन प्रयत्न नक्कीच असतो
===============
--नवं-चारोळीकार
----------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ स्टेटस.एंटरप्रुनरशीप.कॉम)
------------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.09.2022-सोमवार.