आदिमाया आदिशक्ती
आदिमाया आदिशक्ती तुच जननी साऱ्यांची
घेऊन आलो दारी तुझ्या एक वारी भक्तीची || धृ ||
नवदुर्गा, गायत्री, अंम्बे चामुंडा तु इंद्राणी
फरस धारणी उमा, शीतला तु नारायणी
जगदंबा, आई भवानी माते त्रिपुरासुंदरी
कात्यायनी लक्ष्मी असो कृपा आम्हावरी
जागर करु नवरात्रींचा इच्छा सगळ्यांची || १ ||
आदिमाया आदिशक्ती तुच जननी साऱ्यांची
नऊ रुपे नित्य नवी तुझीच गे माऊली
सदा असो आम्हांवरी तव कृपेची गे सावली
साडेतीन शक्तीपीठे जागृत तुझीच गे आई
झुकवितो श्रद्धेने माथा मी तुझ्याच गे पायी
कृपादृष्टी राहो कायम प्रार्थना ऐक या भक्ताची || २ ||
आदिमाया आदिशक्ती तुच जननी साऱ्यांची
दैत्य संहारक महामाया पावक तु सर्वांना
होऊन राहू तुझेच सेवक हर्ष होई भक्तांना
एकरूपी ॐकारणी वैष्णवी तुच गे वराही
ठेव भक्ता माथी वरदहस्त आशेने मी पाही
ऐकावी हाक आर्त माते, आम्हा सर्व भक्तांची || ३ ||
आदिमाया आदिशक्ती तुच जननी साऱ्यांची
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९