मित्र/मैत्रिणींनो,
आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, पं.वसंतराव देशपांडे यांनी गायिलेले एक गीत. या गीताचे शीर्षक आहे- "कुणि जाल का, सांगाल का"
"कुणि जाल का, सांगाल का"
-------------------------
कुणि जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा ?
रात्री तरी गाऊ नको, खुलवू नको अपुला गळा
आधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली
परत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली
फार पूर्वीचा दिला तो श्वास साहुन वाळला
आताच आभाळातला काळोख मी कुरवाळला
सांभाळुनी माझ्या जिवाला मी जरासे घेतले
इतक्यात येता वाजली हलकी निजेची पावले
सांगाल का त्या कोकिळा, की झार होती वाढली
आणि द्याया दाद कोणी रात्र जागुन काढली
===============
गीत :आ. रा. देशपांडे 'अनिल'
संगीत : यशवंत देव
स्वर : पं. वसंतराव देशपांडे
===============
--प्रकाशक : शंतनू देव
--------------------
(साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
(संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
-----------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.10.2022-शनिवार.