मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-91
-------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--ही चारोळी अश्या प्रेमिकांना समर्पित आहे , ज्यांचे एकमेकांवर उत्कट , अत्त्युच्च प्रेम आहे , निरातिशय प्रेम आहे . त्या दोघांनाही , म्हणजे प्रियकर आणि त्याच्या प्रेयसीला माहित आहे , की आपल्या दोघांत एक असं विशिष्ट नातं आहे , की ज्याची वाच्यता दोघांनाही करता येत नाही . आपल्या दोघांनाही ते एकमेकांना आजवर कधीही सांगता आलेलं नाही . खूप काही सांगायचं असतं . मनात भावनांची, प्रेमाची गुंफण त्यात होत असते . शब्द तर तयार होत असतात . पण ते मात्र ओठांवर येईपर्यंत आपसूकच थांबतात . ओठांद्वारे ते कधीही व्यक्त होत नाहीत . या भावना मग मात्र मनातच राहून जातात . तुलाही ते मला सांगता येत नाही , आणि मलाही तुला सांगायचा संकोच वाटतो . तर असं हे आपलं अशब्द ,अव्यक्त असं नातं हे फार पलीकडे जाऊन पोचलेलं आहे , आणि ते फक्त तुला आणि मलाच माहित आहे .
====================
असं नातं आहे आपल्यात
जे आपल्या दोघांनाही सांगता येत नIही ...
मनात भावनांची गुंफण होऊनही
शब्दं मात्र ओठांत येत नाहीत ...
====================
--संकलक-पियुष तायडे
--------------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझ्या लेखणीतून.ब्लॉगस्पॉट.कॉम)
------------------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-17.10.2022-सोमवार.