इतर कविता
(क्रमांक-19)
------------
मित्र/मैत्रिणींनो,
"इतर कविता" अंतर्गत मी इतर कवींच्या कविता आपणापुढे सादर करीत आहे .
जमलंच तर परत ये !!!
---------------------
भावनेसाठी नको, पण मन दुखावण्यासाठी तरी परत ये !
साथ देऊ नको, पुन्हा सोडून जाण्यासाठी तरी परत ये !
कुणा-कुणाला सांगू, तुझं सोडून जाण्याचं दुःख;
किमान जगात माझी, अब्रु राखण्यासाठी तरी परत ये !
महागाई फार वाढली, अश्रुही संपले माझे;
पुन्हा एकदा फक्त, मला रडवण्यासाठी तरी परत ये !
मी वेडा, मी मूर्ख, मी बावळट, मी अक्कलशून्य;
तू तुझा समजूतदारपणा दाखवण्यासाठी तरी परत ये !
थोडीतरी कर, माझ्या प्रेमाची किंमत तू;
कवडीमोल भासले तर, भीक घालण्यासाठी तरी परत ये !
तुझ्या आठवणींत झुरुन, मन माझे खाक झाले;
या नश्वर देहाला, आग देण्यासाठी तरी परत ये !
--कुलकर्ण्यांचा निरज
(inspired from a urdu gazal)
--------------------------------
संकलक- सुजित बालवडकर
-------------------------
(साभार आणि सौजन्य-मराठीकविता.वर्डप्रेस.कॉम)
--------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.10.2022-बुधवार.