वाहणे खांद्यावरी ते,
गर्भ ....
कोवळ्या वासनांचे,
रक्ताळलेल्या जाणीवा अन..
व्याकूळता ओल्या स्पंदनांची !
पेलणे ओझे सदाचे,
माथ्यावरी संवेदनांचे..
गुंजती रंध्रात सार्या,
गुढगर्भित कंपने...
तृषार्त मुक्या शब्दांची !
सोसणे नकोसे अताशा,
पराभव वेदनांचे...
लढतो आहे जीव कधीचा,
लढाई आपुल्याच...
जिर्ण ओल्या जखमांची !
प्रश्न..प्रश्न ?; उत्तर नाही..,
शोधणे नेहमीचे...
शोधतो आहे आरंभापासुन
कारणे ...
माझ्याच पराभवाची !
विशाल.
Nice one.......
प्रश्न..प्रश्न ?; उत्तर नाही..,
शोधणे नेहमीचे...
शोधतो आहे आरंभापासुन
कारणे ...
माझ्याच पराभवाची
मन:पूर्वक आभार गौरी, तुम्ही आवर्जुन माझ्या कविता वाचताहात हे पाहून खुप बरे वाटते आहे :D