मित्र/मैत्रिणींनो,
आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, "सुवासिनी" या चित्रपटातील श्रीमती आशा भोसले यांनी गायिलेले एक गीत. या गीताचे शीर्षक आहे- "हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता"
"हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता"
----------------------------------
राजहंस सांगतो कितीर्च्या तुझ्या कथा
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
पाहिले तुला न मी, तरी ही नित्य पाहते
लाजूनी मनोमनी, उगीच धूंद राहते
ठावूक न मजसी जरी निषध देश कोणता
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
दिवस रात्र ओढणी, या मनास लागते
तुझीच जाहल्या परी, मी सदैव वागते
मैत्रिणीस सांगते, तुझी अमोल योग्यता
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
निमंत्रणाविना पुन्हा हंस येई तो वनी
नाद चित्र रेखितो, तुझेच मंद कुजनी
वेड वाढवून तो उडून जाय मागूता
हृदयी प्रीत जागते जाणता, अजाणता
============
गीत : ग.दि.माडगुळकर
गायक : आशा भोसले
संगीत : सुधीर फडके
चित्रपट : सुवासिनी
============
--प्रकाशक : शंतनू देव
--------------------
(साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
(संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
-----------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-26.10.2022-बुधवार.