मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-101
------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--मानवी स्वभावाचा पैलू सर चंद्रशेखर गोखले या चारोळीतून दाखवून देतात . परस्पर विरोधी असा स्वभाव आपणास सर्व ठिकाणी पाहावयास मिळतो . नव्हे तो तर आपल्यातही दडलेला असतो . याला पुस्ती म्हणून , जोडता ते म्हणतात , वाचकहो , घर हे नुसतं घरचं नसतं , तर ते नात्यांनी जोडलेलं एक पवित्र मंदिर असतं . आणि त्यात अनेक जण रहात असतात . सुख-दुःख अनुभवीत असतात . एक जण आक्रस्ताळी , त्रागा करणारा , रागीट , कडक , कठोर स्वभावाचा असला , तर दुसरा हा नेहमीच मृदू , नरम-दिल , शांत , संयमी असावाच लागतो . कारण जर का दोघेही एकाच स्वभावाचे , सम-स्वभावी असतील , तर घराला घरपण हे राहणार नाही . त्यामुळे एकाने जरी घरातल्या वस्तू पसरवल्या , तर दुसऱ्याने शांतपणे , न चिडचिड करता त्या सावरायच्या असतात , आवरायच्या असतात , आणि तेव्हाच हे नातं परिपूर्ण असं होतं .
=============
घर हे दोघांचं असतं
ते दोघांनी सावरायचं असतं
एकाने पसरवल तर
दुसऱ्याने आवरायचं असतं
=============
--चंद्रशेखर गोखले
----------------
--संकलक-पियुष तायडे
(Friday, April 10, 2015)
--------------------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझ्या लेखणीतून.ब्लॉगस्पॉट.कॉम)
-------------------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.10.2022-गुरुवार.