मित्र/मैत्रिणींनो,
आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, श्री सुरेश वाडकर यांनी गायिलेले एक गीत. या गीताचे शीर्षक आहे- "पहाटे पहाटे मला जाग आली"
"पहाटे पहाटे मला जाग आली"
---------------------------
पहाटे पहाटे मला जाग आली
तुझी रेशमाची मिठी सैल झाली !
मला आठवेना... तुला आठवेना ...
कशी रात्र गेली कुणाला कळेना
तरीही नभाला पुरेशी न लाली !
तुझी रेशमाची मिठी सैल झाली !
गडे हे बहाणे, निमित्ते कशाला ?
असा राहू दे हात माझा उशाला
मऊमोकळे केस हे सोड गाली !
तुझी रेशमाची मिठी सैल झाली !
कसा रामपारी सुटे गार वारा
मला दे उशाशी पुन्हा तू उबारा
अता राहू दे बोलणे, हालचाली !
तुझी रेशमाची मिठी सैल झाली !
तुला आण त्या वेचल्या तारकांची
तुला आण त्या जागणाऱ्या फुलांची
लपेटून घे तू मला भोवताली !
तुझी रेशमाची मिठी सैल झाली !
==========
गीत : सुरेश भट
संगीत : रवि दाते
स्वर : सुरेश वाडकर
==========
--प्रकाशक : शंतनू देव
--------------------
(WEDNESDAY, MAY 25, 2011)
---------------------------------
(साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
(संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
-----------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-28.10.2022-शुक्रवार.