मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-105
-------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--चारोळीकार सुधीर-सरांनी प्रेमात येणारे अविस्मरणीय क्षण , फारच सुदंर रीतीने येथे कथित केले आहेत . ते म्हणतात , केव्हा केव्हा प्रेमात विरह हा सहन करावाच लागतो . त्यावेळी होणारी मनाची स्थिती ही तोच जाणू शके , की ज्याने फक्त निस्वार्थीच प्रेम केले आहे . पुढे ते म्हणतात , की हा विरह जेव्हा प्राक्तनात असतो , किंवा नशिबी येतो , तेव्हा कायम मनी वसलेल्या , ठरलेल्या त्या मूर्त प्रेमास विसरणं फारच कठीण असतं . तो प्रेमाचा चेहरा , ज्याच्यावर आपण प्रेम केलं ती व्यक्ती , अगदी जवळची असली , तरी ही फारकत , दुरावा अशी काही परिस्थिती निर्माण करतो की , ती व्यक्ती सान्निध्यात असूनही , तिच्यासाठी तरसाव लागत , तिच्यासाठी जीव झुरत असतो . अंती , प्राक्तनात लिहिलेलं भोगावं लागत , त्यापुढे मानवी प्रयत्न सर्वथा अयशस्वीच ठरतात .
=============
खूप अवघड असत
त्या एका चेहऱ्याला विसरणं
त्याच्याजवळ असून सुद्धा
त्याच्यासाठी तरसण...
=============
--सुधीर जगताप
--------------
--संकलक-पियुष तायडे
(Tuesday, March 17, 2015)
------------------------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझ्या लेखणीतून.ब्लॉगस्पॉट.कॉम)
-------------------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-31.10.2022-सोमवार.