मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-108
-----------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--चोरट प्रेम , अबोल प्रेम कसं असतं , आणि त्यातून काय निष्पन्न होतं , हे चंद्रशेखर सरांनी या चारोळीतून अतिशय भाव-पूर्ण रित्या दाखवून दिले आहे . चारोळीतील कथित प्रेयसीचं आपल्या प्रियकरावर निःशब्द , अबोल प्रेम आहे . याची वाच्यता ती कधीही करीत नाही . पण त्यालाही केव्हातरी तिच्या नजरेतील प्रेमभाव समजलेला असतो . आणि मग बऱ्याच वेळा त्या दोघांची येता-जाता नजरा-नजर होतं असते . आणि तिला फक्त एवढंच पुरेसं असतं . तिला वाटून राहातं , की तो मला रोज पहातोय ना , एवढंच मला बाई पुरेसं आहे , मग बोलायची काय गरज आहे . भेटायची काय गरज आहे . आणि मग घरकामे वगैरे उरकल्यानंतर , जेव्हा ती मोकळी होऊन मागल्या-दारी फावल्या वेळात बसते , तेव्हा तिला हे सर्व अवचित आठवू लागते . त्याची ती प्रेम-नजर , जाता जाता पुन्हा पुन्हा मागे वळून तिजकडे कटाक्ष टाकणे , हे तिला खूपच भावलेलं असतं . आणि या सर्व दिवसभराच्या आठवणीत ती गुंगून जाते , आणि स्वतःचंही भान हरपून बसते .
===============
नुसतं दिसणं पुरेसं असतं
बोलायची गरज नसते ..
अशी नजरभेट मग किती वेळ
मागल्यादारी मी आठवत बसते..
===============
--चंद्रशेखर गोखले
----------------
--संकलक-पियुष तायडे
(Saturday, January 17, 2015)
---------------------------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझ्या लेखणीतून.ब्लॉगस्पॉट.कॉम)
-------------------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.11.2022-गुरुवार.