मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-109
------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--फारच छान , सुंदर उपमा असलेली ही चारोळी फक्त चंद्रशेखर सरांनाच सुचू शकते , यात वादच नाही . ते म्हणतात , थंडी पडली की खूपदा ती असह्यच अशी असते . मग उन्हात जाऊन त्या थंडीपासून उब मिळावी म्हणून बरीच लोक खूप वेळ बसतात . काही अंशी त्यांना थंडीपासून , या गारव्यापासून राहतही मिळते . पण ती क्षणिकच असते . कारण थंडी मी म्हणत असते , आणि या असून नसलेल्या उन्हाचा प्रभाव तिजपुढे काहीच उरतं नाही . ते ऊन क्षणार्धात या थंडीपुढे गुडघे टेकत . पुढे सर म्हणतात , हे ऊन असं असतं , की जणू कुणी माणूस क्षणिक रागावलंय , पण या थंडीपुढे निष्प्रभ होऊन आपली हार मानून , आपला पराजय स्वीकारून मग गालातल्या गालात हसून शरणागती पत्करणारIच जणू .
============
हे थंडीतलं ऊन कसलं
असून नसल्या सारखं
रुसलेलं माणूस कोणी...
गालातच हसल्या सारखं
============
--चंद्रशेखर गोखले
----------------
--संकलक-पियुष तायडे
---------------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझ्या लेखणीतून.ब्लॉगस्पॉट.कॉम)
-------------------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.11.2022-शुक्रवार.