मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-112
-------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--तू फक्त माझी आणि माझीच असं म्हणणार हे माझं वेड मन , तुझा कसा आभास निर्माण करतंय , हे चंद्रशेखर सरांच्या या चारोळीतील नायक आपणास सांगू पहात आहे .तो म्हणतोय , काही काही वेळा तू जेव्हा माझ्यासोबत नसतेस , तेव्हा उगाचच मला तुझा भास , आभास होत रहात असतो . हा भास इतका तीव्र असतो , की मग वाटून राहतं की तू खरोखरच माझ्या जवळ आहेस . तू मला स्पष्ट दिसत आहेस . तुझं अस्तित्त्व मला जाणवू लागलंय . हा भास इतका सत्य , पराकोटीचा खरा असतो , की क्षणभर माझे डोळेही मला फसवून जातात , आणि म्हणू लागतात , की मी तुला पाहिलंय . तू मला दिसलीस . मला राहून राहून माझंच आश्चर्य वाटू लागतं , की हे डोळे खरं बोलताहेत, की माझं मन खरं सांगतंय ? काही काही वेळा मला काहीच उमजत नाही .
=============
वेड्या क्षणी भास् होतो
तू जवळ असल्याचा
डोळे उगीच दावा करतात
तू स्पष्ट दिसल्याचा ...
=============
--चंद्रशेखर गोखले
----------------
--संकलक-पियुष तायडे
(Thursday, December 11, 2014)
------------------------------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझ्या लेखणीतून.ब्लॉगस्पॉट.कॉम)
--------------------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.11.2022-सोमवार.