मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-147
------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--नवं-चारोळीकार चारोळी लिहिताना , ती पण खास करून आपल्या प्रेयसीबद्दल , फार मोठ्या , जड-बंबाळ, शब्द-बंबाळ या गोष्टीत न पडता , सहज-सुंदर असं लिहीत जातो . तो लिहितोय , हे प्रिये , तू इतकी नाजूक आहेस , मृदू ,कोमल आहेस की तुझ्यावर फारच अवजड-बोजड शब्द लिहिण्यास मला जड जात . मी आजवर इतक्या चारोळ्या , कविता लिहिल्यात . पण तुझ्या नाजुकपणावर लिहिण्यास मला फार विचार करावा लागतोय . तुझी नजाकत इतकी आहे , तू इतकी कोमल, नाजूक आहेस की मी तुझ्यावर आता चारोळी काय कविता लिहिण्यास ही बंद केले आहे . इतकं की नुसतं नाजूक हाही शब्द लिहिताना माझा हात आखडतोय . अजून तुझ्या या नाजुकपणाला, मृदुत्त्वाला, कोमलतेला मी कुठली संज्ञा , उपमा देऊ ?
==================
तुझ्या नाजुकपणावर लिहायचं म्हणजे,
मला खुपच अवघड वाटतं.
कविता-चारोळ्या तर लांबच,
'नाजुक' शब्द सुद्दा जरा जड वाटतं.
==================
नवं-चारोळीकार
--------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-माझ्या लेखणीतून.ब्लॉगस्पॉट.कॉम)
-------------------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.12.2022-सोमवार.