मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-157
-----------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--नवं-चारोळीकाराने या गुलाबी थंडीत प्रेमी-प्रेमिकांचे वर्तन कसे असावे याचे लाजवाब वर्णन केले आहे . त्याच्या चारोळीतील प्रियकर आपल्या प्रेयसीस म्हणतोय . प्रिये , आज कालच्यापेक्षा जरा जास्त थंडी पडली आहे . आजच काय गेल्या कित्येक वर्षात अशी थंडी आपण अनुभवली नव्हती . एक निमित्त मला मिळालेय , की या गुलाबी थंडीत तुझ्या अधिक जवळ यावे , तुला बिलगावे , तुला घट्ट मिठी मारावी , तुझ्या कुशीत शिरून प्रेम-गीत गावे . अन असे करता-करता , तुझा भरगच्च कृष्ण-कुंतल बुचडा सोडवून त्यात मनसोक्त हात फिरवावेत . त्या तलम , रेशमी , मुलायम , काळ्याभोर केश-संभारात खोल खोल बुडून जावे . आणि या प्रेमाच्या वाढत्या धगीत अजून हरवत जाऊन तुझ्या काळ्याभोर टपोऱ्या डोळ्यातून तुझ्या मनाचा वेध घ्यावा . तुझे सखोल अंतरंग पाहावे . त्यात समरस होऊन जावे . आणि ही जी इच्छा केलीय ती परमेश्वराने खरी करावी , हेच त्याच्याकडे माझे मागणे आहे , त्याला प्रार्थना आहे .
=====================
गुलाबी थंडीत, तुझ्या कुशीत शिरावे,
काळ्याभोर केशसंभारात हात गुंफावे,
तुझ्या टपोऱ्या डोळ्यात हरवून जावे,
देवाजवळ एकच प्रार्थना, हे सगळे खरे व्हावे
=====================
नवं-चारोळीकार
--------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-मन माझे.ब्लॉगस्पॉट.कॉम)
-------------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.12.2022-गुरुवार.