"श्रवणीय मराठी गाणी"
---------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज ऐकुया,"श्रवणीय मराठी गाणी" या गीत-मालिके-अंतर्गत, TV serial from Zee Marathi-Ratris Khel Chale 2 Title Song Lyrics.-एक गाणे. या गाण्याचे बोल आहेत- "रात्रीस खेळ चाले.."
"रात्रीस खेळ चाले.."
-------------------
पाचोळा झाला गोळा
वारा ही शांत आहे
निष्पर्ण उभे हे झाड
पान पान शोधत आहे
सावल्या आता न हलती
उरली न कसली माया
डोहाच्या खोल तळाशी
अतृप्त परतीच छाया
अशुभाचे दान पडता
निशब्द तरंग उठले
काळाचे चक्र जरासे
काळाने मागे नेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
=======================
पाचोळा सैरावैरा वारा पिसाट वाहे
भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे
सावली मुक्याने वाहती भोवताली विनती माया
डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया
निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले
आकार गूढ धुक्याला आले विरून गेले
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
रात्रीस खेळ चाले..
=======================
==================
TV Serial: Ratris Khel Chale
Music: Pankaj Padghan
Singer: Sayali Pankaj
Music Label: Zee Marathi
==================
--lkadmin
(August 17, 2022)
---------------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-लैरिकस कट्टा.कॉम)
-------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-01.01.2023-रविवार.