अंतरिच्या जखमांना लपविले कितिदा
घाव तुझे ह्र्दयावर झेलले कितिदा
नकार तुझा मस्तकावर घेऊन, मी
ऊध्वस्त अश्वथामा भटकलो कितिदा
संपला विश्वास जगण्यावर आता
नकारात होता रुकार वाटले कितिदा
अवस्थेस माझ्या जबाबदार कोण??
पुसले अनेक प्रश्न मजला कितिदा
नाव तुझे ह्र्दयावर कोरले होते
ऒठांवर येऊ दिले नाहि कितिदा
आयुष्यात पुन्हा वसंत अनुभवलाच नाही
अनेक श्रावण येऊन,बरसुन गेले कितिदा
जगी सर्व दु:खी मीच आहे वाटले
'पर दु:ख शीतल' ऎकले कितिदा
माफ करुन विसरायचे म्हंटले, तरि
सुड घ्यावा असे वाटले कितिदा
घराकडे तुझ्या वळणार नाही बोललो
पाऊले फिरुन तेथे परतति कितिदा
ह्र्दयात प्रेमांकुर नंतर फुललाच नाही
सुंदर चेहरे जरि पाहिले कितिदा
- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे) :'(
:'( ........... mastach!!! ................ khup avadali
KEEP IT UP MAN ,,,,,,,,,/////