"काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !"
--------------------------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, एक गीत. या गीताचे शीर्षक आहे- "आठवड्यातल्या दिवसांशी जरा खेळावस वाटतं"
"आठवड्यातल्या दिवसांशी जरा खेळावस वाटतं"
------------------------------------------
आठवड्यातल्या दिवसांशी जरा खेळावस वाटतं
प्रत्येक दिवशी काहीतरी करावस वाटतं
सोमवारी म्हंटल जावं जरा तलावाकाठी
सहज तिथे तिची आठवण काढण्यासाठी
मंगळवारी घ्यावं म्हंटल वाचन तरी हाती
विचारांसोबत जीवन उंच नेण्यासाठी
बुधवारी म्हणावं साला अभ्यासच करतो
गुरुवार पर्यंत तर करूनच दाखवतो
शुक्रवार खरतर माझा आवडता नाही
पण आला कि तो मी विसारातही नाही
कारण शुक्रवारीच ती मला भेटली होती
हसली होती ती पाहून , जरी खोटी खोटी
शनिवार काढावा म्हंटल भेटायला मित्रांना
सहज उनाडक्या करत रस्त्यावर फिरतांना
सांगावी त्यांना सप्ताहाची कहाणी
न सहज निघाव्या जुन्या आठवणी
जगण्यासाठी काहीतरी शिकवून तो जातो
संपताना रविवार विचार एक येतो
कि
"नसावा आठवडा तसाच आणि दिवसही पुढचे तेच
नसावा आठवडा तसाच आणि दिवसही पुढचे तेच ,
नको जीवनातले ..... सगळे आठवडे सारखेच ...सगळे आठवडे सारखेच"
--प्रकाशक : शंतनू देव
--------------------
(साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
(संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
-----------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-08.01.2023-रविवार.