Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Prem Kavita => Topic started by: Atul Kaviraje on January 12, 2023, 05:52:03 PM

Title: प्रेम-गीत-जीवनी आलास माझ्या, तू माझाच होऊन सजणा
Post by: Atul Kaviraje on January 12, 2023, 05:52:03 PM
मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक प्रेम-गीत ऐकवितो. "आये हो मेरे जिंदगी मे, तुम बहार बनके"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली नवं-वर्षाची ही सांज-गुरुवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे - (आये हो मेरे जिंदगी मे, तुम बहार बनके)
----------------------------------------------------

                      "जीवनी आलास माझ्या, तू माझाच होऊन सजणा"
                     --------------------------------------------

जीवनी आलास माझ्या, तू माझाच होऊन सजणा   
मनातही राहा ना माझ्या, रे सख्या
मनात राहून माझ्या, तू प्रेम गीत गा ना,
जीवनी आलास माझ्या, तू माझाच होऊन सजणा.

तुझ्याचसाठी होते, अथक प्रयास माझे
तुझ्याचसाठी होते, सारे बहाणे माझे
तुला पाहून झाले फिदा, रे लाडक्या
तुला पाहून झाले फिदा, मी तुझ्यावर पहाना,
जीवनी आलास माझ्या, तू माझाच होऊन सजणा.

प्रेम जडले तुजवरी, तू मला मोहित केलेस
जीव जडला तुजवरी, मी तुझी आज झाले
जीव ओवाळून टाकला, रे प्रियकरा
जीव ओवाळून टाकला, तू माझं सर्वस्वच ना,
जीवनी आलास माझ्या, तू माझाच होऊन सजणा.

माझ्या प्रेमास दिले उत्तर, अंती मज तू ओळखिले
माझ्या प्रेमास पारखूनि, मला आपलीशी केले
तुझी उतराई कशी होऊ, रे प्रिया
तुझी उतराई कशी होऊ मी, मला स्वीकारिलेस तू ना,
जीवनी आलास माझ्या, तू माझा होऊन सजणा.

जीवनी आलास माझ्या, तू माझा होऊन सजणा
मनात भरलास माझ्या, मी तुलाच वरले ना
आता विलंब नको करुस, रे सख्या
आता विलंब नको करुस, जन्मोजन्मीचे नाते अपुले ना,
जीवनी आलास माझ्या, तू माझा होऊन सजणा,
जीवनी आलास माझ्या, तू माझा होऊन रहाना.

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.01.2023-गुरुवार.

(विशेष सूचना- कुणालाही या गाण्याचा योग्य तो वापर करायचा असेल, किंवा गायचे असेल, तर माझी काही हरकत नाही. तुम्ही हे गाणे गाऊ शकता, मला याचे काहीही अधिकार नकोत.)
=========================================