मित्र/मैत्रिणींनो,
ऐकूया, बेवफा सजणीची बेवफाई. प्रेम निभावण्यास त्याची प्रेयसी लायक नव्हती, उलट तिचे कुणा दुसऱ्यावर प्रेम होते. प्रेमात फसलेल्या, प्रेमाचा विश्वासघात झालेला, हताश, निराश झालेल्या, आपल्या बेवफा सजणीची ही बेवफाई या प्रियकराने पुढील विरह-कवितेतून सांगितली आहे. हे दुःख, हा विरह सांगणाऱ्या कवितेचे शीर्षक आहे- "डाव प्रेमाचा असा उधळलास ?"
"डाव प्रेमाचा असा उधळलास ?"
-----------------------------
आज डोळ्यातील पाणी खळेना
तुझी प्रीत मज कळेना
तुझ्यावर होता माझा विश्वास,
तरी, डाव प्रेमाचा असा उधळलास ?
कुठे गेली ती वचने ?
कुठे गेल्या त्या आणा-भाका ?
आश्वासनांचा दिलास फक्त भास,
डाव प्रेमाचा असा उधळलास ?
सच्चे प्रेम केले तुजवरी
होतीस माझ्या स्वप्नातली परी
रंग स्वप्नांचा बेरंगी केलास,
डाव प्रेमाचा असा उधळलास ?
खरे प्रेम होते तुझ्यावर
विश्वास होता माझा तुझ्यावर
थोडा काळच लाभला सहवास,
डाव प्रेमाचा असा उधळलास ?
भातुकलीचा खेळ समजलीस प्रेमाला
अर्धाच खेळायचा अन सोडून द्यायचा
घेऊनच चाललीस तू माझा श्वास,
डाव प्रेमाचा असा उधळलास ?
ही रीत कुठली प्रेमाची ?
ही प्रीत असली विरहाची ?
प्रेमावर नाही उरलाय विश्वास,
डाव प्रेमाचा असा उधळलास ?
मज टाकून तू गेलीस
अन नकळत दुसऱ्याची झालीस
प्रेमाचा तू व्यवहारच मांडलास,
डाव प्रेमाचा असा उधळलास ?
एकटा मी जगेन कसातरी
दुःख विरहाचे घेऊन उरी
एकचं मागणे अखेरचे तुजपाशी,
पुन्हा फसवू नकोस कुणास !
तुझ्यावर होता माझा विश्वास,
तरी, डाव प्रेमाचा असा उधळलास ?
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-12.01.2023-गुरुवार.
=========================================