"काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !"
-------------------------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज ऐकुया, "काही गाणी आठवणीतली, काही साठवणीतली !" या गीत-मालिके -अंतर्गत, श्री सुधीर फडके यांनी गायिलेले एक गीत. या गीताचे शीर्षक आहे- "विठ्ठला, तू वेडा कुंभार"
"विठ्ठला, तू वेडा कुंभार"
----------------------
फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार
विठ्ठला, तू वेडा कुंभार ॥ धृ. ॥
माती, पाणी, उजेड, वारा,
तूच मिसळशी सर्व पसारा
आभाळच मग ये आकारा
तुझ्या घटांच्या उतरंडीला नसे अंत ना पार ॥ १ ॥
घटाघटाचे रूप आगळे,
प्रत्येकाचे दैव वेगळे
तुझ्याविणा ते कोणा न कळे
मुखी कुणाच्या पडते लोणी, कुणामुखी अंगार ॥ २ ॥
तूच घडवीसी, तूच फोडीसी,
कुरवाळिसी तू, तूच ताडीसी
न कळे यातून काय जोडिसी
देसी डोळे परी निर्मिसी तयापुढे अंधार ॥ ३ ॥
=============
गीत – ग. दि. माडगुळकर
गायक – सुधीर फडके
संगीत - सुधीर फडके
=============
--प्रकाशक : शंतनू देव
(MONDAY, FEBRUARY 21, 2011)
------------------------------------
(साभार आणि सौजन्य-माणिक-मोती.ब्लॉगस्पॉट.कॉम)
(संदर्भ-♫ गाणीमराठी.com ♫♪)
------------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-13.01.2023-शुक्रवार.