मित्र/मैत्रिणींनो,
आज मी तुम्हाला एक, प्रेमाच्या असमर्थतेची कविता-गीत (SAD SONG) ऐकवितो. "क्या हुआ तेरा वादा, वो क़सम वो इरादा"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही रजनी-शनिवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.
--मूळ हिंदी गाणे -(क्या हुआ तेरा वादा, वो क़सम वो इरादा)
----------------------------------------------------
"वादI करून प्रिये विसरलीस, शपथा कश्या साऱ्या भुललीस ?"
------------------------------------------------------
वादI करून प्रिये विसरलीस,
शपथा कश्या साऱ्या भुललीस ?
वादI करून प्रिये विसरलीस,
शपथा कश्या साऱ्या भुललीस ?
मग प्रेम तरी का केलेस ?
का सारी वचने तू दिलीस ?
वादI करून प्रिये विसरलीस,
शपथा कश्या साऱ्या भुललीस ?
प्रेम तुला खेळच वाटलंI जणू,
दिलेली वचने तू नाही निभावलीस !
मी मात्र मनापासून केलंय प्रेम
तुझं मी नेहमीच चिंतलंय क्षेम
मी तुला विसरू शकेन, शक्यच नाही,
माझ्या आयुष्याचा तो शेवटचाच दिवस असेलही.
आठवतंय मला तू म्हटलेलं
मिठीत माझ्या गोड गुपित सांगितलेलं
हेही आठवतंय नाही मी कधी रुसणार,
फक्त हसणार आणि फक्त हसणार.
प्रत्येक संध्याकाळ तेव्हा तुझी होती
माझ्यासवे तू सूर्यास्त पाहत होतीस
आज कुठे गेला तुझा लाघवीपणा,
आज तुझ्या हास्यात आहे कडवटपणा.
हे सारं तू विसरलीस काय ?
हे सारं तुला आठवत नाही काय ?
असं कसं तू माझ्याशी वागलीस ?
माझ्याशी प्रतारणा का केलीस ?
जग मला धोकेबाज म्हणतंय
जग मला कपटी म्हणतंय
खरा धोकेबाज त्यांना नाही माहित,
प्रेमातलं जगाला कळतं नाही काही.
हे गुपित मलाच माहितंय
प्रेमातले दुःख मलाच कळतंय
तू माझं प्रेम विकत घेतलंय,
तू प्रेमाचं आज मोलच केलंय.
पैश्यांची धुंदी अजुनी डोळ्यांवर
त्याला काय माहित प्रेम आणि दुःख
वफाई शब्द फार दूर राहिला,
बेवफाईचा सूर तुझ्या मनात उमटला.
वादI करून प्रिये विसरलीस,
शपथा कश्या साऱ्या भुललीस ?
वादI करून प्रिये विसरलीस,
शपथा कश्या साऱ्या भुललीस ?
मग प्रेम तरी का केलेस ?
का सारी वचने तू दिलीस ?
वादI करून प्रिये विसरलीस,
शपथा कश्या साऱ्या भुललीस ?
प्रेम तुला खेळच वाटलंI जणू
दिलेली वचने तू नाही निभावलीस !
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-04.02.2023-शनिवार.
=========================================