मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-202
-----------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--नवं-चारोळीकार प्रेमाच्या चारोळ्यांनी प्रेमी जीवांच्या आयुष्याचे प्रत्येक प्रेम-क्षण कसे रंगवून टाकत आहे , पहा . त्याच्या या चारोळीतील प्रियकराचे हे मनोगत ऐका . त्याला वाटतं , की माझी प्रेयसी रोज माझ्याबरोबर यावी , आणि आम्ही दोघेही फिरता फिरता मस्त गप्पात रंगून जावे . आम्ही एकमेकांच्या सहवासIत गुंग , मग्न असताना कोठल्यातरी विचाराने मग तिने दचकावं , आणि आवेगाने मला बिलगावं . तिने माझ्या कुशीत यावं , मला घट्ट मिठी मारावी . पुढे तो म्हणतोय , की प्रेमाची ही वाटचाल जणू सप्तरंगीच आहे . ती इंद्रधनूचेच रंग ल्याली आहे . आणि अश्या रंगी-बेरंगी वाटचालीत , प्रवासात मला माझ्या प्रेयसीची आयुष्यभराची सोबत हवी , साथ हवी . असे सुख-स्वप्न रंगवणारे प्रेमी-जोडपे आपल्याला वारंवार , नेहमीच भेटत असतात .
==============================
💝 "चालताना हळूच दचकून माझ्या कुशीत येणारी प्रेयसी हवी,
प्रेमाच्या या सप्तरंगी वाटचालित मला तुझी साथ हवी".💘
==============================
--नवं-चारोळीकार
----------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
--------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-05.02.2023-रविवार.
=========================================