मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-204
-----------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--नवं-चारोळीकार आज प्रेम-हास्यावर एक चारोळी आपणास ऐकवीत आहे . त्याच्या चारोळीतील प्रियकर असं म्हणतोय , त्याचे असे मनोगत आहे , ती जेव्हा मधाळ हसते , गोड हसते , तेव्हा मला नक्की कळतं नाही की ती खूप गोड हसते , की हसतानाच खूप गोड दिसते . यातला फरक मला आजही कळून येत नाही . ती हसताना , मी फक्त तिच्या चेहऱ्याकडे पाहत बसतो , कारण तिचे मधुर हास्य माझी नजर खिळवून ठेवते . हसताना तिचा चेहरा असा खुलतो , की जशी गुलाबाची एखादी ताजी , टपोरी कळी फुलून तिचे रूपांतर एका मोहक , सुंदर आणि लक्षवेधक अश्या मोठ्या गुलाब-पुष्पात व्हावे .
============
💝 "ती खूप गोड हसते,
कि हसताना ती खूप
गोड दिसते💘
ह्यातला फरक मला
कधीच कळत नाही...
ती हसताना,
मी फक्त तिच्याच
चेहऱ्याकडे पाहत बसतो...
कारण,
हसताना तिचा
चेहरा असा खुलतो,
जशी गुलाबाची
एक कळी फुलते💘
============
--नवं-चारोळीकार
----------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
--------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-07.02.2023-मंगळवार.
=========================================