Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: Atul Kaviraje on February 14, 2023, 11:13:02 AM

Title: एकटेपणाच्या दुःखावर कविता-शेवटी मी एकटाच उरलोय, तुझ्यावरल्या आसक्तीने भंग पावलोय
Post by: Atul Kaviraje on February 14, 2023, 11:13:02 AM
मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला एक, एकटेपणाच्या दुःखावर कविता-गीत ऐकवितो. "मिलने है मुझसे आई, फिर जाने क्यूँ तन्हाई, किस मोड़ पे है लायी, आशिक़ी"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही मंगळवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(मिलने है मुझसे आई, फिर जाने क्यूँ तन्हाई, किस मोड़ पे है लायी, आशिक़ी)
------------------------------------------------------------------------

            "शेवटी मी एकटाच उरलोय, तुझ्यावरल्या आसक्तीने भंग पावलोय !"
           -----------------------------------------------------------

शेवटी मी एकटाच उरलोय,
तुझ्यावरल्या आसक्तीने भंग पावलोय !

शेवटी मी एकटाच उरलोय,
तुझ्यावरल्या आसक्तीने भंग पावलोय !
हे कोठले वळण घेतंय प्रेम ?
या कुठल्या वळणावर नेतंय प्रेम ?

मला एकटं ठेवून शेवटी
हे वळण स्वतःच वळलंय
माझं पाऊल आजही नकळत,
तेथेच थांबलंय, तेथेच रुळलंय.

माहित नाही, ही लढाई आहे स्वतःशी
जाणत नाही, ही लढाई आहे माझ्या खुदाईशी
या आसक्तीत मी स्वतःच हरवलोय,
या प्रेमाच्या ओढीने माझं स्वत्त्वच हरवलंय.

ही आसक्ती जणू जुगार आहे पत्त्यांचा
हा खेळ आहे विश्वास अन अविश्वासाचा
अजूनही मी आहे अजाण, आजही आहे नादान,
मार्ग स्वीकारलाय मी आज एकटेपणाचा. 

मला आज असं का वाटतंय
एक ओसाड, निर्जन रस्ता आहे मी ?
मला असं का भासतंय आज,
या वाटेवरला एकुलता प्रवासी आहे मी  ?

तुझा विश्वास हरवलेला एक वाटसरू आहे मी
की तुलाच गमावलेला एक माथेफिरू आहे मी
वाटतंय, मी स्वतःलाच हरवून बसलोय,
वाटतंय, मी स्वतःलाच विसरून गेलोय.

मला शोधण्याचे तुझ्यात बळ आहे ?
काळच ठरवेल, किती खरं आणि किती खोटं आहे ?
शपथा, वादे सारे राहिले दूरच,
आसक्तीने बंद केलंय विश्वासाचे द्वारच.

माझ्या पेटीतले सूर आज बिघडलेत
माझ्या वाद्याच्या तारा आज तुटल्यात
माझा आवाज आज लागत नाहीय,
सरगम माझ्या बेसुऱ्या झाल्यात.

माझ्या स्वरात ती कशिश नाहीय
माझ्या गीतात ती बंदिश नाहीय,
माझा हरवलेला स्वर मी आजही शोधतोय,
माझा हरवलेला नूर मी आजही शोधतोय.

शेवटी मी एकटाच उरलोय,
तुझ्यावरल्या आसक्तीने भंग पावलोय !

शेवटी मी एकटाच उरलोय,
तुझ्यावरल्या आसक्तीने भंग पावलोय !
हे कोठले वळण घेतंय प्रेम ?
या कुठल्या वळणावर नेतंय प्रेम ?

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2023-मंगळवार.
=========================================