"व्हॅलेन्टाईन्स डे-प्रेम दिवस"
-------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज दिनांक-१४.०२.२०२३-मंगळवार आहे. "व्हॅलेन्टाईन्स डे" हा "प्रेम दिवस" म्हणून १४ फेब्रुवारी रोजी जगभर साजरा केला जातो. हा एक ख्रिश्चन सण सुद्धा आहे. हा दरवर्षी १४ फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या आवडत्या व्यक्तीला शुभेच्छा संदेश, फुले किंवा चॉकलेट पाठवून प्रेम व्यक्त करतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व मराठी बंधू-भगिनी कवी-कवयित्रीस प्रेम-दिनाच्या अनेक हार्दिक आणि प्रेम शुभेच्छा. वाचूया प्रेमावर काही कविता.
"दिवस ते प्रेमाचे"
----------------
बरसत होता श्रावण
गवसले मनाला आंदण
उरले ना भान जगाचे
वेड लागले तुझ्या नयनांचे.....
होते दिवस ते प्रेमाचे
तुझ्या माझ्या प्रीतीचे.....
तुझिया तळमळीने
होई जीवाची तगमग
तुझी लागत चाहूल
स्पदनांची वाढावी धकधक
तुज साठी झुरण्याचे
फुलासारखे फुलण्याचे.....
होते दिवस ते प्रेमाचे
तुझ्या माझ्या प्रीतीचे....
--मनस्वी पोयामकार
------------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
-----------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2023-मंगळवार.
=========================================