मित्र/मैत्रिणींनो,
आज मी तुम्हाला आजच्या १४ फेब्रुवारीच्या प्रेम दिवसावर, एक प्रेम कविता-गीत ऐकवितो. "ये शाम मस्तानी, मदहोश किये जाये, मुझे डोर कोई खींचे, तेरी ओर लिये जाये"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही सांज-मंगळवार प्रेममय होवो, ही सदिच्छा.
--मूळ हिंदी गाणे-(ये शाम मस्तानी, मदहोश किये जाये, मुझे डोर कोई खींचे, तेरी ओर लिये जाये)
--------------------------------------------------------------------------
"ही संध्याछाया उतरू लागलीय, मला तुझ्या समीप आणू लागलीय !"
-----------------------------------------------------------
ही संध्याछाया उतरू लागलीय,
मला तुझ्या समीप आणू लागलीय !
ही संध्याछाया उतरू लागलीय,
मला तुझ्या समीप आणू लागलीय !
धुंदफुंद रजनी उंबरठा ओलांडीत,
जीवाला तुझी हुरहूर देत अवतरलीय !
ही संध्याछाया उतरू लागलीय,
मला तुझ्या समीप आणू लागलीय !
भयभीत अस्वस्थ तनाला मनाला,
तुझी एक अनामिक ओढ लागलीय !
तरीही तू इतकी दूर का आहेस ?
आजही तू इतकी उदास का आहेस ?
नजदिक येणं तू का टाळते आहेस ?
हा देह वृथा का जाळते आहेस ?
ही तृष्णा तुला अधिकच प्यासी ठेवेल
ही तृष्णा तुझी तहान अधिकच वाढवेल
हे विषाचे कडू घोट तू का गिळतेस ?
कोणत्या दुःखाने तू इतकी बेचैन होतेस ?
असं काय आहे तुझ्या मनात साचत ?
की नाही ते तुझ्या ओठांवर फुलत
तुझ्या नयनात हा अनोळखीपणा का ?
तुझ्या जवळ येण्यापासून मला तो थांबवत !
बघ, तुझ्याप्रमाणे मीही निशब्द आहे
खरं तर मला खूप बोलायचं आहे
पण तुझ्या लाजेचा हा नूर पाहून,
शब्द माझ्या ओठांमध्येच घुटमळत आहे.
हा अबोला का ? हा रुसवा का ?
हा अलिप्त भाव का ? हा परकेपणा का ?
ही तुझ्या ओठांची घट्ट मिठी सोड,
उमलू दे हास्य, त्यात तू दिसतेस गोड.
तुझी नजरच तुझ्या मनीचा भाव सांगतेय
नकळत एक अजबसI इशारा देतेय
आता संकोच सोड, हे बंधन तोड,
ही रात्रही काही सांगतेय, धून छेडतेय.
पहा, ही रात्रही आपल्यासाठी थांबलीय
आपली भेट पाहण्या ती उत्सुक झालीय
आता उशीर कशाला, आता विलंब कसला,
आपल्या मनोमिलनाची ही पहिली रात्र उगवलीय.
ही संध्याछाया उतरू लागलीय,
मला तुझ्या समीप आणू लागलीय !
ही संध्याछाया उतरू लागलीय,
मला तुझ्या समीप आणू लागलीय !
धुंदफुंद रजनी उंबरठा ओलांडीत,
जीवाला तुझी हुरहूर देत अवतरलीय !
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-14.02.2023-मंगळवार.
=========================================