II छत्रपती शिवाजी महाराज जयंती II
---------------------------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज दिनांक-१९.०२.२०२३-रविवार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसार आज जयंती आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्वत:च राज्य निर्माते होते. शुन्यातून जग निर्माण करण्याची जिद्द व हिंमत त्यांच्यात होती. मातोश्री जिजाबाईंचे प्रोत्साहन, गुरुवर्य दादोजी कोंडदेव यांचे मार्गदर्शन आणि मावळ्यांच्या मदतीने त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जिजाऊंचं एकच स्वप्न होतं, ते म्हणजे मराठी स्वराज्याची स्थापना करायचं. छत्रपतींनी आपल्या मुत्सद्दीगिरी, शौर्य व आत्मबळावर हे स्वप्न साकार करुन दाखविलं. (१९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली. त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी कवी-कवियत्रीस छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया, शिवाजी महाराजांच्या काही कविता.
छत्रपति शिवाजी महाराज कविता--
टेकूनी माथा जया चरणी
मी वंदन ज्यासी करितो...
नित्यारोज तयांचे
नवे रूप मी स्मरितो...
न भूतो न भविष्यती
ऐसेची होते माझे शिवछत्रपती...
जन्मले आई जिजाऊ उदरी
पावन झाली अवघी शिवनेरी...
ऐकत असता पोवाडा सदरी
त्यात वर्णिली राणी पद्मिनी...
रजपूत राणी सुंदर विलक्षणी
कैद झाली मोघल जनानखानी...
चरचर कापले हृदय शिवरायांचे
डोळ्यात दाटले अश्रू संतापाचे...
कडाडले शिवरायsss
आम्ही आहो वंशज रामरायाचे
दिवस भरले आता मोघलांचे...
ज्याची फिरेल नजर वाकडी
आईबहिणीकडे....
त्याच क्षणी शीर मारावे
हुकुम घुमला चोहीकडे...
काबीज करता कल्याण-भिवंडी
अमाप आला हाती खजिना...
वेळ न दवडिता सरदारांनी
सादर केला एक नजराणा...
कल्याण सुभेदाराची
स्नुषा विलक्षण सुंदर...
उभी होती राजांपुढती
झुकुवूनी घाबरी नजर...
धीमी पाऊले टाकीत राजे
तिज जवळी आले...
रूप पाहुनी विलक्षण सुंदर
राजे पुढे वदले....
जर का आमच्या मांसाहेब
इतक्या सुंदर असत्या.....
आम्ही तयांचे पुत्र लाडके
असेच सुंदर निपजलो असतो....
वंदन तुजला शतदा करतो
धन्य तू शिवराया....
स्त्री जातीचा मान राखुनी
तूच शिकविले जगाया....!!
=========================================
(साभार एवं सौजन्य-संदर्भ-हिंदी गाईड्स.इन)
---------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-19.02.2023-रविवार.
=========================================