Marathi Kavita : मराठी कविता

मराठी कविता | Marathi Kavita => Other Poems | इतर कविता => Topic started by: Atul Kaviraje on February 22, 2023, 10:05:38 PM

Title: प्रेम-दुःखावर कविता-प्रेमातले दुःख तुझ्यामुळेच समजलेय, बेचैन मनाचे पडसाद उमटलेय
Post by: Atul Kaviraje on February 22, 2023, 10:05:38 PM
मित्र/मैत्रिणींनो,

     आज मी तुम्हाला, प्रेमातल्या दुःखावर कविता-गीत ऐकवितो. "दर्द-ए-दिल, दर्द-ए-जिगर दिल में जगाया आपने"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही निशा-बुधवार आनंदाची जावो, ही सदिच्छा.

--मूळ हिंदी गाणे-(दर्द-ए-दिल, दर्द-ए-जिगर दिल में जगाया आपने)
----------------------------------------------------------

          "प्रेमातले दुःख तुझ्यामुळेच समजलेय, बेचैन मनाचे पडसाद उमटलेय !"
         --------------------------------------------------------------

प्रेमातले दुःख तुझ्यामुळेच समजलेय,
बेचैन मनाचे पडसाद उमटलेय !😒

प्रेमातले दुःख तुझ्यामुळेच समजलेय,
बेचैन मनाचे पडसाद उमटलेय !😒
ही पीडा, हे दर्द आधी नव्हते जाणवत,
हे सर्व सर्व तूच जागवलेय !

प्रेमातले दुःख तुझ्यामुळेच समजलेय,
बेचैन मनाचे पडसाद उमटलेय !😒
तूच होतीस कारणीभूत हृदय वेदनेला,
हृदय शत खंडात माझे विखुरले गेलेय !

कोण होतो मी, कोण झालो मी ?
एक कवी होतो मी साधा सुधा
प्रेमात तुझ्या गुंतत राहिलो मी,
झालो तुझं दिवाणा, झालो तुझा बंदा.

असे जखडून मला तू प्रेम-पाशात
या शायरचे नाव बदनाम करून टाकलेस
आशिक करून तू मला तुझ्या दिलाचा,
कायमचे मला तुझे करून टाकलेस.

आता शायर मी नाही, तूच आहेस
शायरी मी नाही लिहीत, तूच लिहीत आहेस
ही गजल आता माझी नाही,
ही गजलही आता तूच गात आहेस.

चित्र आता पुरेपूर पालटूनच गेलंय
कोणी मला आता शायर म्हणत नाहीय
तूच वदवली होतीस शायरी माझ्या मुखातून,
तूच लेखणी होऊन लिहिली होतीस स्वतःहून.

माझ्या गाण्याचे तेव्हा पडसाद उमटायचे
माझ्या गजलांची पुन्हा फर्माईश व्हायची
त्या साऱ्यांची आता पडछाया झालीय,
कोण जाणे तीही आता कुठेतरी हरवलीय. 

माझ्या मैफिलीत तेव्हा जान असायची
माझी गजल त्यात जान भरायची
आज ती मैफिल अगदी एकाकीच झालीय,
मित्रांची बैठक केव्हाच रिकामी झालीय.

नक्की काय झालय, काही कळत नाही
उदासवाणी सायंकाळ आता रोजच होत राही
अशी काय तू जादू केलीस, प्रिये,
रंगमंच सजतI सजतI पडदाचं पडून जाई.

आलीस केव्हा, बोललीस केव्हा, कधीच नाही कळले
हसलीस केव्हा, प्रेमात पडलीस केव्हा, नाहीच कळले😊💕
आणि आता सोडून जायचं म्हणतेस,
मैफिलीचा रंग उधळून टाकायचंI म्हणतेस.

एवढं तरी बोल, तुझा पत्ता कुठला ?
इतकं तरी सांग, अन्यथा माझा मार्गच खुंटला
नुसती हसून जाऊ नकोस, तुझं नाव तरी सांग,
आणखी तडपवू नकोस, माझ्या जख्मी दिलाला. 

दर्द दिलास, आता दवIही तूच दे
माझ्या भग्न हृदयाला औषधही तूच दे
जीव जडलाय तुझ्यावर, लाडके,👍
तुझ्या मुखातून फक्त होकार येऊ दे.

प्रेमातले दुःख तुझ्यामुळेच समजलेय,
बेचैन मनाचे पडसाद उमटलेय !😒

प्रेमातले दुःख तुझ्यामुळेच समजलेय,
बेचैन मनाचे पडसाद उमटलेय !😒
ही पीडा, हे दर्द आधी नव्हते जाणवत,
हे सर्व सर्व तूच जागवलेय !

प्रेमातले दुःख तुझ्यामुळेच समजलेय,
बेचैन मनाचे पडसाद उमटलेय !😒
तूच होतीस कारणीभूत हृदय वेदनेला.
हृदय शत खंडात माझे विखुरले गेलेय !

-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.02.2023-बुधवार.
=========================================