कुल
अलिकडेच काही खासदारांना sting operation प्रश्न विचारण्यासाठी पैसे
घेतांना दाखवले होते. त्यांच्या मनात आता हेच गाणे सुरु असेल
चाल :
फुलले रे क्षण माझे फुलले रे....
फिरले रे ग्रह माझे फिरले रे
ओढीने, पैशांच्या, पैशांच्या ओढीने, भुलले रे मन माझे भुलले रे
लेकरे टी.व्हीची आली रे घेउन मागणी माझ्यापुढे
गरीब घराची जाणीव होऊन धावले मन वेडे
या वेडाने, या वेडाने, लावीले शनीचे फेरे
ओढीने, पैशांच्या ओढीने, तुटले रे जन माझे तुटले रे
फिरले रे ग्रह माझे फिरले रे....
विचार सोडुन, मनासी मोडुन, पैसे ते स्विकारले
पैशांना जागुन, सभेत जाउन, प्रश्नही विचारले
त्या चोरांनी, त्या चोरांनी, ठेवले होते कॅमेरे
ओढीने, पैशांच्या ओढीने, मोडले रे घर माझे मोडले रे
फिरले रे ग्रह माझे फिरले रे....
- सुभाष डिके
;D Aprateem, phar bare vatle kavita vachun!! Kepp it Up! and keep sending! :D
:D ;D ;D ;D
Nice one........ :) ;) :D :D
कल्ला विडंबन आहे राव, जबराट ! 8)