मला आवडलेल्या चारोळ्या
चारोळी क्रमांक-236
-----------------------
मित्र/मैत्रिणींनो,
--नवं-चारोळीकार आज प्रेमाच्या विशेषणांची , उपमांची जणू बरसातच या चारोळीत करीत आहे . त्यासाठी त्याने निसर्गातील प्रत्येक जिवंत वस्तू या वैशिष्ट्यांसाठी वापरलेली आहे . प्रेमाला त्याने एका उच्च स्तरावर नेऊन ठेवले आहे . ही उत्तम चारोळी तुम्ही वाचा आणि प्रत्यक्ष अनुभव देखील .
==================
तुझं माझ्यावरचं प्रेम म्हणजे
गवत पात्यावर फुललेल्या
मोहक फुलासारखं
मोराच्या पिसाऱ्यावरील
वेधक मोरपंखी डोळ्यांसारखं
समुद्रातील फेसाळलेल्या
उधाण लाटेसारखं
क्षितिजावरील उगवलेल्या सूर्याच्या
विखुरलेल्या उन्हासारखं
माळावर चांदण्याची
लयलूट करणाऱ्या चंद्रासारखं..🌃🌃
==================
--नवं-चारोळीकार
----------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-क्रिएटर मराठी.कॉम)
--------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.03.2023-शनिवार.
=========================================