"नेट-भेट"
गीत-भेट-27
------------
मित्र/मैत्रिणींनो,
"नेट-भेट" च्या अंतर्गत आज पाहूया आणि ऐकुया एका सुंदर आणि प्रसिद्ध गाण्याची भेट. या गाण्याचे बोल आहेत- "अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती"
"अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती"
--------------------------------------
"अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती
आम्हीहि सुंदर झालो असतो" वदले छत्रपती !
शिवरायाच्या दरबारी त्या युवती मोहक ती
सुभेदाराची सून लाडकी भयकंपित होती
शब्द ऐकता चकित जाहली हरिणीसम ती रती !
वसंतातले यौवन होते नयनी मादकता
रूप अलौकिक मनमोहक ते कोमल बाहुलता
सौंदर्याची प्रतिमा परि ती प्रभू माता मानिती !
अलंकार ते वस्त्रभूषणे - देउन मानाने
परत सासरी पाठविले तिज शिवभूपालाने
रायगडाच्या पाषाणांतुन शब्द अजुन येती !
=============
गीतकार -मधुकर जोशी
संगीतकार -दशरथ पुजारी
गायक -दशरथ पुजारी
=============
(साभार आणि सौजन्य-संदर्भ मराठी सॉंग्स.नेटभेट.कॉम)
------------------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-11.03.2023-शनिवार.
=========================================