II श्री रामनवमी II
-----------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज दिनांक-३०.०३.२०२३-गुरुवार आहे. आज "श्री राम नवमी" आहे. चैत्र शुद्ध नवमी हा हिंदू पंचागानुसार चैत्र महिन्यातील नवरात्राचा नववा दिवस आहे. या तिथीस भगवान विष्णूचा सातवा अवतार समजले गेलेले श्री राम यांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे. हा दिवस श्री रामनवमी म्हणून साजरा करतात. त्या दिवशी दुपारी सूर्य डोक्यावर आल्यावर (दुपारी १२:०० वाजता) रामजन्माचा सोहळा होतो. मराठी कवितेच्या माझ्या सर्व बंधू-भगिनी, कवी-कवयित्रींनी राम-नवमीच्या हार्दिक शुभेच्छा. वाचूया, श्री राम-नवमीच्या काही कविता.
"राम नवमी अभंग....!"
----------------------
राम राम राम।काम काम काम।
घाम घाम घाम।मग दाम।
राम आराधन।रामची साधन।
रामची विधान।समाधान।।
कामातही राम।श्रमातही राम।
दामातही राम। दिसतसे।।
राम हे जीवन। राम हे कवन।
राम हे गायन। जीवनात।
राम सारी दुःख। राम सारी पीडा।
राम सारी चिंता। सदोदित।।
सदैव मनात। सदैव तनात।
सदा अंतरात। राम असे।।
सूख समाधान।शांतीचे विधान।
असे आराधन।अखंडित
रामची बोलावा । रामची लिहावा।
रामची वाचावा। जन्मभर।।
सुटेल गुंता।मिटेल चिंता।
रामची अनंता।जाणोनिया।।
--प्रशांत शिंदे
------------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
-----------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-30.03.2023-गुरुवार.
=========================================