II रमजान ईद II
-----------------
मित्र/मैत्रिणींनो,
आज दिनांक-२२.०४.२०२३-शनिवार आहे. आज "रमजान ईद" आहे. रमजान महिन्यातील रोजे संपल्यानंतर ईद येते. ईदला नवीन वस्त्र परिधान करून मुस्लिम बांधव ईदगाह किंवा मशिदीत नमाज अदा करायला जातात. अल्लाच्या प्रती नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधव एकमेकांना आलिंगन देऊन ईदच्या शुभेच्छा देतात. या दिवशी मित्र असो वा शत्रू ते दोघांची गळाभेट घेऊन शुभेच्छा देतात. मराठी कवितेच्या माझ्या सर्व मुस्लिम भाऊ-बहीण, कवी-कवियत्रींना रमजान ईद च्या अनेक हार्दिक शुभेच्छा. वाचूया रमजान ईद वर कविता.
"ईद मुबारक"
-------------
रमजान ईदचे महत्व,
उपवास एक महिन्याचा.
संयम श्रध्देने हा पाळला,
महिमाच मोठा ह्या सनाचा.
दिवस जाई उपवासात,
रात्र इबादत करण्यात.
घालवितो हा पुर्ण महिना,
संयमाने जीन जगण्यात.
उत्सव आहे वर्षभराचा,
दान,धर्म आणि हा प्रेमाचा.
गोड हि मिठाई, शिरखुर्मा,
झगमगाट हा पोषाखांचा.
आपुलकीने गळा भेटुया,
एकमेकांना शुभेच्छा देऊ.
प्रेम देऊन सर्वांना आता,
फरक सर्व सोडून देऊ.
मुबारक,ईद मुबारक,
रमजान ईदच्या शुभेच्छा.
सर्वाच माझ्या भारतीयांना,
रमजान ईदच्या सदिच्छा.
--एस.के.जी
-----------
(साभार आणि सौजन्य-संदर्भ-स्टोरी मिरर.कॉम)
-----------------------------------------
-----संकलन
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-22.04.2023-शनिवार.
=========================================